दाविदाचे शौलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला. शौलाने त्या दिवशी त्याला ठेवून घेतले; त्याला आपल्या बापाच्या घरी जाऊ दिले नाही. मग योनाथानाने दाविदाशी आणभाक केली; कारण तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता. योनाथानाने आपल्या अंगावरचा झगा उतरवून दाविदाला दिला; त्याप्रमाणे आपला पेहराव, तलवार, धनुष्य व कमरबंदही दिला. जिकडे जिकडे शौल दाविदाला पाठवी, तिकडे तिकडे जाऊन तो चतुराईने कार्यसिद्धी करी; शौलाने त्याला योद्ध्यांवर नेमले. हे सर्व लोकांना पसंत पडले; तसेच शौलाच्या सेवकांनाही ते पसंत पडले.
१ शमुवेल 18 वाचा
ऐका १ शमुवेल 18
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 18:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ