तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्यावर चालून आलास; पण इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस; त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल; मी तुझा वध करीन, व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन; तेव्हा इस्राएलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल
१ शमुवेल 17 वाचा
ऐका १ शमुवेल 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 17:45-46
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ