दावीद शौलास म्हणाला, “आपला दास आपल्या बापाची शेरडेमेंढरे राखत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले, तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले आणि कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवले; माझ्यावर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची आयाळ धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.” दावीद आणखी म्हणाला, “ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला ह्या पलिष्ट्याच्या हातून सोडवील.” तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, “जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.” शौलाने आपला पेहराव दाविदाला लेववला, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढवले. दावीद आपली तलवार आपल्या चिलखतावरून बांधून चालून पाहू लागला; कारण त्याला ह्यापूर्वी त्याचा सराव नव्हता. दावीद शौलाला म्हणाला, “हे घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला ह्यांचा सराव नाही;” म्हणून दाविदाने ते उतरवून ठेवले. मग त्याने आपली काठी हाती घेतली; ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेवले, आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ट्याकडे गेला.
१ शमुवेल 17 वाचा
ऐका १ शमुवेल 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 17:34-40
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ