YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 17:28-33

१ शमुवेल 17:28-33 MARVBSI

दावीद त्या लोकांशी बोलत होता ते त्याचा वडील भाऊ अलीयाब ह्याने ऐकले; तेव्हा तो दाविदावर संतापून म्हणाला, “येथे आलास कशाला? थोडीशी शेरडेमेंढरे आहेत ती रानात तू कोणाच्या हवाली केली आहेत? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे; तू केवळ लढाई पाहायला येथे आला आहेस.” दावीद म्हणाला, “मी काय केले? मी नुसता एक शब्द बोललो ना?” मग तो त्याच्यापासून निघून दुसर्‍या एकाकडे गेला व तेथेही त्याने तसेच विचारले; तेव्हा लोकांनी पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. दावीद बोलला ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शौलाला कळवले; व त्याने त्याला बोलावणे पाठवले. मग दावीद शौलाला म्हणाला, “त्या पलिष्ट्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये; आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल.” शौल दाविदाला म्हणाला, “ह्या पलिष्ट्याशी लढायला तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस, आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे.”