YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 15:26-29

१ शमुवेल 15:26-29 MARVBSI

शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत येणार नाही; कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारला आहे, आणि परमेश्वराने इस्राएलावरील राजपदावरून तुला झुगारले आहे.” शमुवेल जाऊ लागला तेव्हा त्याने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला. तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “परमेश्वराने इस्राएलावरील तुझे राजपद तुझ्यापासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजार्‍याला दिले आहे. जो इस्राएलाचे केवळ वैभव आहे, तो खोटे बोलणार नाही; तो पस्तावा करणार नाही, त्याला पस्तावा व्हावा असा तो काही मानव नाही.”