पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’ ते तुम्ही पूर्वी ‘लोक नव्हता,’ आता तर ‘देवाचे लोक आहात; तुम्हांला दया मिळाली नव्हती,’ आता तर ‘दया मिळाली आहे.’ प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्या दैहिक वासनांपासून दूर राहा. परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा.
1 पेत्र 2 वाचा
ऐका 1 पेत्र 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 पेत्र 2:9-12
5 दिवस
देवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान देणे ही काही एक वेळची घटना नाही... ही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही विश्वासात नवीन असाल किंवा ख्रिस्ताचे "अनुभवी" अनुयायी असाल, तरीही, तुम्हाला ही योजना समजण्यास आणि लागू करण्यास सोपी वाटेल आणि विजयी ख्रिस्ती जीवनासाठी एक अत्यंत प्रभावी धोरण वाटेल. "या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
6 दिवस
प्रभु येशू ख्रिस्त आपल्यासोबत अंतरंगाच्या गुजगोष्टी करू इच्छितो. चला तर आपण एकत्रितपणे “प्रभुभोजनाचा मेज” या विषयावर मनन-चिंतन करू या. प्रभु येशूने प्रस्थापित केलेले हे भविष्यसूचक कार्य आपण कशासाठी आणि का साजरे करतो या विषयी नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिलेला (आणि विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केलेला) हा सहा दिवसीय भक्ति-लेख आपणांस एका वेगळ्या चिंतनयात्रेवर घेऊन जाईल.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ