आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात, त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्लास करता, तरी तुम्ही आता थोडा वेळ, भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दु:ख सोसले; ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.
1 पेत्र 1 वाचा
ऐका 1 पेत्र 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 पेत्र 1:3-9
7 दिवस
ख्रिस्ताला आमच्या मुक्ततेसाठी पाठवून देवाने आमच्यासाठी जे काही केले त्या सर्व गोष्टींकडे मागे वळून पाहून त्यावर चिंतन करण्याचा ख्रिसमस हा योग्य समय आहे. तुम्ही हे भक्तीपर वाचन करत असतांना, मी प्रार्थना करतो की तुम्ही तुमची सुटका/मुक्ती आठवल आणि नवीन वर्षात या आत्मविश्वासाने पदार्पण कराल की तो तुम्हाला पुढे असलेल्या मार्गावर चालण्यासाठी ज्या गोष्टींपासून सोडवणे आवश्यक आहे त्यापासून तो तुम्हाला पुन्हा सोडवील.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ