YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 1:22-25

1 पेत्र 1:22-25 MARVBSI

निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने आत्म्याच्या द्वारे शुद्ध करून घेतले आहेत, म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून म्हणजे ‘देवाच्या जिवंत व सर्वकाल टिकणार्‍या’ शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. कारण, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे; आणि तिचा सर्व गौरव गवताच्या फुलासारखा आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते; परंतु प्रभूचे ‘वचन सर्वकाळ टिकते.”’ ‘सुवार्तेचे जे वचन तुम्हांला सांगण्यात आले’ ते हेच होय.