काही दिवसांनी सोरचा राजा हीराम ह्याने आपले सेवक शलमोनाकडे पाठवले; शलमोनाचा अभिषेक होऊन तो आपल्या बापाच्या जागी गादीवर बसल्याचे वर्तमान त्याने ऐकले होते; हीराम व दावीद ह्यांची अखंड मैत्री होती. शलमोनाने हीरामास सांगून पाठवले की, “माझे वडील दावीद ह्यांचे शत्रू परमेश्वर पादाक्रांत करीपर्यंत त्यांच्या सभोवार युद्ध चालले असल्यामुळे त्यांना आपला देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी मंदिर बांधता आले नाही हे आपल्याला ठाऊक आहे. पण आता माझा देव परमेश्वर ह्याने मला चोहीकडे स्वास्थ्य दिले आहे; कोणी शत्रू अथवा अरिष्ट राहिले नाही. पाहा, मी आपला देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी मंदिर बांधण्याचे योजले आहे; परमेश्वराने माझे वडील दावीद ह्यांना म्हटले होते की, “तुझ्या जागी तुझ्या गादीवर तुझा जो पुत्र मी बसवीन तोच माझ्या नामासाठी मंदिर बांधील.” त्याप्रमाणे मी करणार आहे. तर आता माझ्यासाठी लबानोन पर्वतावरील गंधसरू कापण्याची आज्ञा द्या; माझे सेवक आपल्या लोकांबरोबर राहतील; जी काही मजुरी आपण ठरवाल ती मी आपल्या सेवकांना देईन; आपल्याला हे ठाऊक आहे की इमारतीसाठी लाकडे कापायचे कसब सीदोनी लोकांसारखे आमच्या लोकांपैकी कोणात नाही.” शलमोनाचा हा निरोप ऐकून हीरामास फार आनंद झाला व तो म्हणाला, “ह्या थोर राष्ट्रावर राज्य करण्यासाठी दाविदाला असा शहाणा पुत्र ज्याने दिला आहे त्या परमेश्वराचा आज मी धन्यवाद करतो.”
१ राजे 5 वाचा
ऐका १ राजे 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ राजे 5:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ