यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी अहाबाचा पुत्र अहज्या शोमरोन येथे इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने इस्राएलावर दोन वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, त्याच्या आईबापांच्या आणि इस्राएल लोकांच्या हातून पाप करवणारा नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या मार्गाने तो चालला. आपल्या बापाप्रमाणे त्याने बआलाच्या मूर्तींचे भजनपूजन करून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संतप्त केले.
१ राजे 22 वाचा
ऐका १ राजे 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ राजे 22:51-53
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ