YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 18:22-24

१ राजे 18:22-24 MARVBSI

एलीया लोकांना म्हणाला, “परमेश्वराच्या संदेष्ट्यांपैकी मी एकटाच उरलो आहे; बआलाचे संदेष्टे तर साडेचारशे आहेत. आम्हांला दोन गोर्‍हे द्यावेत; त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो गोर्‍हा घ्यावा; त्याचे त्यांनी कापून तुकडे करावेत आणि ते लाकडांवर रचावेत, पण त्यांना अग्नी लावू नये; मग मीही दुसर्‍या गोर्‍ह्याचे तसेच करून तो लाकडांवर रचीन व त्याला अग्नी लावणार नाही. तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या आणि मी परमेश्वराचे नाव घेतो; जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा.” सर्व लोक म्हणाले, “ठीक आहे.”