YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 18:1-8

१ राजे 18:1-8 MARVBSI

पुष्कळ दिवस लोटल्यावर, तिसरे वर्ष लागले तेव्हा एलीयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, “जा, अहाबाच्या दृष्टीस पड; मी पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करणार आहे.” त्याप्रमाणे अहाबाच्या दृष्टीस पडावे म्हणून एलीया निघाला. त्या वेळी शोमरोनात भयंकर दुष्काळ होता. अहाबाने आपला घरकारभारी ओबद्या ह्याला बोलावणे पाठवले; हा ओबद्या परमेश्वराला फार भिऊन वागत असे. ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध करीत होती तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसर्‍या गुहेत पन्नास असे लपवले व त्यांना अन्नपाणी पुरवले. अहाब ओबद्यास म्हणाला, “देशात फिरून पाण्याचे झरे, नाले असतील ते सर्व शोधून पाहा; घोडे व खेचरे ह्यांचा जीव वाचवण्यापुरते गवत कोठेतरी कदाचित मिळेल व अशाने आमची सगळी जनावरे मरणार नाहीत.” सगळा देश धुंडाळावा म्हणून त्यांनी तो आपसात वाटून घेतला; एका मार्गाने अहाब गेला व दुसर्‍या मार्गाने ओबद्या गेला. ओबद्या वाट चालत असता एलीया त्याला भेटला; त्याने त्याला ओळखले आणि दंडवत घालून त्याला म्हटले, “माझे स्वामी एलीया ते आपणच काय?” तो म्हणाला, “होय, तोच मी; जा, आपल्या धन्याला सांग की, एलीया आला आहे.”