YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 16:30-34

१ राजे 16:30-34 MARVBSI

अम्रीचा पुत्र अहाब ह्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले; आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा अधिक वाईट वर्तन त्याने केले. नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या पापकर्मांचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सीदोन्यांचा राजा एथबाल ह्याची कन्या ईजबेल हिच्याशी लग्न केले, आणि तो बआलमूर्तीची सेवा व पूजा करू लागला. त्याने बआलाचे एक भवन शोमरोन येथे बांधले व त्यात बआलाप्रीत्यर्थ एक वेदी बांधली. अहाबाने अशेरा मूर्तीची स्थापना केली. त्याने इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संताप आणण्याजोगी कामे आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या इस्राएलाच्या सर्व राजांहून अधिक केली. त्याच्या कारकिर्दीत बेथेलकर हिएल ह्याने यरीहो नगर पुन्हा वसवले. त्याने त्याचा पाया घातला तेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र अबीराम मरण पावला; आणि त्याने त्याच्या वेशी उभारल्या तेव्हा त्याचा कनिष्ठ पुत्र सगूब मरण पावला; परमेश्वराने नूनाचा पुत्र यहोशवा ह्याच्या द्वारे सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले.