इस्राएलाचा राजा यराबाम ह्याच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी आसा यहूदावर राज्य करू लागला. त्याने एकेचाळीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले. त्याच्या आईचे नाव माका; ही अबीशालोमाची कन्या. आसाने आपला पूर्वज दावीद ह्याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते केले. त्याने पुरुषगमन करणार्यांना देशातून घालवून दिले आणि त्याच्या वाडवडिलांनी केलेल्या एकंदर मूर्ती टाकून दिल्या. त्याने आपली आई माका हिला राजमातेच्या पदावरून दूर केले, कारण तिने अशेराप्रीत्यर्थ एक अमंगळ मूर्ती केली होती. तिने केलेली ती मूर्ती आसाने फोडूनतोडून किद्रोन ओहळाजवळ जाळून टाकली. त्याने उच्च स्थाने मोडून टाकली नाहीत; तथापि आसाचे मन सार्या हयातीत परमेश्वराकडे पूर्णपणे लागलेले होते. त्याच्या बापाने व त्याने स्वतः सोने, चांदी व पात्रे परमेश्वराला वाहिली होती ती सर्व त्याने परमेश्वराच्या मंदिरात नेऊन ठेवली.
१ राजे 15 वाचा
ऐका १ राजे 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ राजे 15:9-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ