YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 15:1-8

१ राजे 15:1-8 MARVBSI

नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाम यहूदावर राज्य करू लागला. त्याने तीन वर्षे यरुशलेमेत राज्य केले; त्याच्या आईचे नाव माका, ती अबीशालोमाची कन्या. त्याच्यापूर्वी त्याच्या बापाने जी पातके केली त्या सर्व पातकांचे अनुकरण त्याने केले; त्याचा पूर्वज दावीद ह्याचे चित्त त्याचा देव परमेश्वर ह्याच्याकडे जसे पूर्णपणे होते तसे त्याचे नव्हते. तथापि दाविदाकरता त्याचा देव परमेश्वर ह्याने त्याचा दीप यरुशलेमेत कायम राहू दिला; त्याच्या पश्‍चात् त्याच्या पुत्राची त्याने स्थापना केली; आणि यरुशलेम नगर सुस्थितीत ठेवले; कारण दावीद परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करीत असे आणि उरीया हित्ती ह्याच्या प्रकरणाखेरीज तो आपल्या आयुष्यभर परमेश्वराने केलेली कोणतीही आज्ञा सोडून बहकला नाही. अबीयामाच्या सगळ्या हयातीत अबीयाम2 व यराबाम ह्यांच्यामधली लढाई चालू राहिली. अबीयामाने केलेल्या इतर गोष्टींचे व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? अबीयाम व यराबाम ह्यांची लढाई चालूच होती. अबीयाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याला त्यांनी दावीदपुरात मूठमाती दिली; त्याचा पुत्र आसा हा त्याच्या जागी राजा झाला.