YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 5:1-5

1 योहान 5:1-5 MARVBSI

येशू हा ख्रिस्त आहे, असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे, आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे?