YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 12:18-27

१ करिंथ 12:18-27 MARVBSI

तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की, “मला तुझी गरज नाही;” तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की, “मला तुमची गरज नाही.” इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत, शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरूण घालून विशेष मान देतो, आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते; आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. जे उणे आहे त्यांना विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे; अशासाठी की, शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते; एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात.