YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 1:12-27

१ करिंथ 1:12-27 MARVBSI

माझे म्हणणे असे आहे की, तुमच्यापैकी प्रत्येक जण “मी पौलाचा,” “मी अपुल्लोसाचा,” “मी केफाचा” आणि “मी ख्रिस्ताचा” आहे, असे म्हणतो. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय? क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणाचाही बाप्तिस्मा मी केला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो. न जाणो, तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावाने झाला असे कोणी म्हणायचा! (आणखी मी स्तेफनाच्या घरच्यांचाही बाप्तिस्मा केला; त्यांच्याखेरीज मी दुसर्‍या कोणाचा बाप्तिस्मा केला की नाही हे माझ्या लक्षात नाही.) कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास नव्हे तर सुवार्ता सांगण्यास पाठवले; पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यास पाठवले नाही. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे. “कारण मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” असा शास्त्रलेख आहे. ‘ज्ञानी कोठे राहिला? शास्त्री कोठे राहिला?’ ह्या युगाचा वाद घालणारा ‘कोठे राहिला?’ देवाने जगाचे ‘ज्ञान मूर्खपणाचे ठरवले’ की नाही? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही,1 तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणार्‍या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. कारण यहूदी चिन्हे मागतात व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करतात, आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहूदी व हेल्लेणी अशा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे; आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे. तर बंधुजनहो, तुम्हांला झालेले पाचारणच घ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत; तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले