YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 7:6-12

१ इतिहास 7:6-12 MARVBSI

बन्यामिनाचे पुत्र : बेला व बेकेर व यदीएल असे तिघे. बेलाचे पुत्र : एस्बोन, उज्जी, उज्जीएल, यरीमोथ व ईरी असे पाच; हे आपल्या पितृकुळाचे प्रमुख असून शूर वीर होते; वंशावळीत ते बावीस हजार चौतीस नमूद झाले होते. बेकेराचे पुत्र : जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ. हे सर्व बेकेराचे पुत्र. ते आपापल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूर वीर होते. वंशावळीत ते वीस हजार दोनशे नमूद झाले होते. यदीएलाचा पुत्र बिल्हान; बिल्हानाचे पुत्र यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर. हे सर्व यदीएलाचे वंशज; ते आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूर वीर होते; सेनेबरोबर जाण्यास लायक असे ते सतरा हजार दोनशे होते. ईराचे वंशज : शुप्पीम व हुप्पीम; आणि अहेराचे वंशज हुशीम.