YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 7:1-5

१ इतिहास 7:1-5 MARVBSI

इस्साखाराचे पुत्र तोला, पुवा, याशूब व शिम्रोन असे चार. तोलाचे पुत्र : उज्जी, रकाया, यरीएल, यहमय, इबसाम व शमुवेल; हे आपला बाप तोला ह्याच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या पिढीतले शूर वीर पुरुष होते; त्यांची संख्या दाविदाच्या काळात बावीस हजार सहाशे होती. उज्जीचा पुत्र इज्रह्या; इज्रह्याचे पुत्र मीखाएल, ओबद्या, योएल व इश्शीया असे पाच होते; हे सर्व प्रमुख पुरुष होते. त्यांच्या कुळांप्रमाणे व पितृकुळांप्रमाणे लढाईच्या सैन्याच्या टोळ्यांत त्यांचे छत्तीस हजार पुरुष असत; कारण त्यांना बायका व मुले पुष्कळ होती. इस्साखाराच्या सर्व कुळांतले त्यांचे भाऊबंद शूर पुरुष होते; वंशावळीत ते एकंदर सत्त्याऐंशी हजार नमूद झाले होते. बन्यामिनाचे वंशज