त्या पशूला आणि त्याच्याबरोबर त्या खोट्या भविष्यवाद्याला कैद करण्यात आले. हा खोटा संदेष्टे, पशूच्या वतीने आपल्या चमत्कारांनी ज्यांनी त्या पशूची खूण धारण केली होती आणि जे त्याच्या मूर्तीची उपासना करीत असत, त्यांना फसविले होते. त्या दोघांनाही गंधकाने सतत जळत राहणार्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले.