1
होशेय 2:19-20
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
MRCV
मी तुला माझ्याबरोबर कायमचे वाग्दत्त असे करेन; मी तुम्हाला नीतिमत्व आणि न्याय, प्रीती आणि करुणा यामध्ये वाग्दत्त करेन. विश्वासूपणाने तुला वाग्दत्त करून घेईन, आणि याहवेहची ओळख तुला होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा होशेय 2:19-20
2
होशेय 2:15
तिथे मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आणि अखोरचे खोरे तिला आशेचे द्वार असे देईन. जेव्हा ती इजिप्तमधून बाहेर आली, तिच्या तारुण्याच्या दिवसात जसे उत्तर देत होती तसेच उत्तर देईल.
एक्सप्लोर करा होशेय 2:15