1
फिलि. 1:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा विश्वास आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा फिलि. 1:6
2
फिलि. 1:9-10
मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी, यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.
एक्सप्लोर करा फिलि. 1:9-10
3
फिलि. 1:21
कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे.
एक्सप्लोर करा फिलि. 1:21
4
फिलि. 1:3
मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो.
एक्सप्लोर करा फिलि. 1:3
5
फिलि. 1:27
सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हास भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्याबाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून शुभवर्तमानाच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.
एक्सप्लोर करा फिलि. 1:27
6
फिलि. 1:20
कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल.
एक्सप्लोर करा फिलि. 1:20
7
फिलि. 1:29
कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हास दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.
एक्सप्लोर करा फिलि. 1:29
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ