तो परमेश्वराजवळ विनवणी करू लागला, “हे परमेश्वरा, मी माझ्या देशात होतो तेव्हा माझे सांगणे हेच होते की नाही? म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची घाई केली, कारण मला माहित होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया संपन्न आहेस. संकट आणल्याबद्दल अनुताप करणारा असा देव आहेस.