हे सर्वजण यरूशलेमेत परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी खुशीने भेटी दिल्या. या वास्तूच्या कामासाठी त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे दिलेली दाने ती अशी: सोने एकसष्ट हजार दारिक, चांदी पाच हजार माने, आणि याजकांचे झगे शंभर.