1
रोमकरांस 12:2
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
MRCV
या जगाशी समरूप होऊ नका; तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की परमेश्वराची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा, ती काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे.
Харьцуулах
रोमकरांस 12:2 г судлах
2
रोमकरांस 12:1
यास्तव, बंधू आणि भगिनींनो, मी परमेश्वराच्या दयेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व परमेश्वराला संतोष होईल असा यज्ञ करावा; हीच तुमची खरी आणि योग्य उपासना ठरेल.
रोमकरांस 12:1 г судлах
3
रोमकरांस 12:12
आशेमध्ये हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेमध्ये विश्वासू असा.
रोमकरांस 12:12 г судлах
4
रोमकरांस 12:21
वाईटाने जिंकले जाऊ नका, तर चांगल्याने वाईटाला जिंका.
रोमकरांस 12:21 г судлах
5
रोमकरांस 12:10
एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा.
रोमकरांस 12:10 г судлах
6
रोमकरांस 12:9
प्रीती निष्कपट असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा. जे चांगले आहे त्याला चिटकून राहा.
रोमकरांस 12:9 г судлах
7
रोमकरांस 12:18
साधेल तर, तुम्हाकडून होईल तितके प्रत्येकाशी शांतीने राहा.
रोमकरांस 12:18 г судлах
8
रोमकरांस 12:19
माझ्या प्रिय मित्रांनो, सूड उगवू नका. तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, असे लिहिले आहे: “सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,” असे प्रभू म्हणतात.
रोमकरांस 12:19 г судлах
9
रोमकरांस 12:11
आस्थेमध्ये कमी पडू नका, तर आपला आध्यात्मिक आवेश कायम राखा व प्रभूची सेवा करा.
रोमकरांस 12:11 г судлах
10
रोमकरांस 12:3
मला दिलेल्या कृपेने मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो: स्वतःला वाजवीपेक्षा अधिक समजू नका, तर आपणास परमेश्वराने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने स्वतःला माना.
रोमकरांस 12:3 г судлах
11
रोमकरांस 12:17
वाईटाने वाईटाची फेड करू नका. सर्वांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करा.
रोमकरांस 12:17 г судлах
12
रोमकरांस 12:16
एकमेकांशी ऐक्याने राहा. गर्विष्ठ होऊ नका. तर अगदी सामान्य लोकांच्या सहवासात आनंद माना, अहंकार बाळगू नका.
रोमकरांस 12:16 г судлах
13
रोमकरांस 12:20
त्याउलट: “तुमचा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल, तर त्याला प्यावयास द्या. असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्यांची रास कराल.”
रोमकरांस 12:20 г судлах
14
रोमकरांस 12:14-15
जे तुमचा छळ करतात; त्यांना शाप देऊ नका; उलट आशीर्वाद द्या. आनंद करणार्यांबरोबर आनंद करा; रडणार्यांबरोबर रडा.
रोमकरांस 12:14-15 г судлах
15
रोमकरांस 12:13
जे गरजवंत असे प्रभूचे लोक आहेत, त्यांना द्या. आदरातिथ्य करा.
रोमकरांस 12:13 г судлах
16
रोमकरांस 12:4-5
आपल्या प्रत्येकाला एक शरीर असून अनेक अवयव आहेत, आणि हे सर्व अवयव एकच कार्य करीत नाहीत. आपण ख्रिस्तामध्ये अनेक असलो, तरी एक शरीर आहोत व आपण सर्व एकमेकांचे अवयव आहोत.
रोमकरांस 12:4-5 г судлах