१ करिंथ 8

8
मुर्तिले चढायेल नैवेद्य
1मुर्तिनं नैवद्यबद्दल, “आपला सर्वासले ज्ञान शे,” हाई आपले माहीत शे. ज्ञान फुगाडस; पण प्रेमतीन प्रगती व्हस. 2जर कोणी समजस की, माले एखादी गोष्ट कळस, तर जसं त्याले कळाले पाहिजे त्याप्रमाणे त्याले अजुन कळेल नही शे. 3जर कोणी देववर प्रेम करस तर, देवले त्यानी वळख व्हयेल ऱ्हास.
4आपले मुर्तिनं नैवद्य खावाबद्दले माहीत शे की, जगमा ज्या मुर्त्या शेतस त्यासमा देवसनं अस्तित्व नही शे, अनी एकशिवाय दुसरा देव नही. 5जर आकाश अनं पृथ्वीवर सांगेल बराच देव शेतस, जश की, बराच देव अनी प्रभु शेतस बी, 6पण आमनाकरता तर एकच देव शे, म्हणजे बाप, ज्यानी सर्वकाही बनाडेल शे अनी ज्यानाकरता आपण बी शेतस, एकच प्रभु येशु ख्रिस्त शे, ज्यानाद्वारे सर्वकाही व्हयनं अनी ज्यानाद्वारे आम्हीन बी शेतस.
7हाई ज्ञान सर्वासकडे ऱ्हास अस नही तर कितलासवर मुर्तिना सवयीसना संस्कार अजुन बी असामुये त्या लोके मुर्तिनं नैवद्य म्हणीसन खातस, त्यामुये त्यासना मन दुर्बळ असामुये ते विटाळस. 8पण जेवण आपलाले देवनाजोडे नही लई जास, जर आम्हीन नही खातस तर आपलं काही कमी नही व्हस, अनी आपण जर खातस तर आपलं काही वाढस नही. 9तुमना हाऊ मोकळेपणा दुसरासले आडफाटानं कारण व्हवाले नको म्हणीन संभाळा. 10कारण ज्ञानवान असा जो तु, त्या तुले मुर्तिना मंदिरमा जेवाले बशेल अस कोणी दखं तर, तो मनतीन दुर्बळ असावर, त्याना मनमा मुर्तिनं नैवद्य खावानं धाडस ईच ना? 11त्याप्रमानतीन जो मनतीन दुर्बळ, ज्यानाकरता ख्रिस्त मरना असा बंधु, त्याना तुना हाई ज्ञान मिळता नाश व्हस. 12भाऊविरूध्द अस पाप करीसन अनं त्याना अशक्त मनले धक्का दिसन तुम्हीन ख्रिस्तविरूध्द पाप करतस. 13जर या जेवणमुये मना भाऊले आडफाटा व्हस, तर मी त्याले आडफाटा व्हवाले नको, म्हणीन मी कधीच मांस खावाव नही.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

१ करिंथ 8: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល