जे तुम्हीन ईतला काळमा शिक्षक व्हवाले पाहिजे व्हतात त्या तुमले देवना वचनसना मुळाक्षरं परत कोणतरी शिकाडाले पाहिजे यानी गरज शे, अनी ज्यासले जड अन्न सहन व्हत नही, दुधच पाहिजे, असा तुम्हीन व्हयेल शेतस. जो कोणी दुध पेस, त्याले बरं अनी वाईट काय शे याना काहीच अनुभव नही ऱ्हास, असा धाकला बाळनामायक तो शे.