1
उत्पत्ती 37:5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
MRCV
एके रात्री योसेफाला एक स्वप्न पडले आणि त्याने ते आपल्या भावांना सांगितले. ते ऐकून तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले.
Lee anya n'etiti ihe abụọ
Nyochaa उत्पत्ती 37:5
2
उत्पत्ती 37:3
इस्राएल योसेफावर आपल्या इतर मुलांपेक्षा अधिक प्रीती करीत असे, कारण त्याला तो म्हातारपणी झाला होता; म्हणून याकोबाने त्याच्यासाठी एक आकर्षक रंगाचा अंगरखा तयार केला.
Nyochaa उत्पत्ती 37:3
3
उत्पत्ती 37:4
जेव्हा त्याच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील त्यांच्यापेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतात, तेव्हा ते योसेफाचा द्वेष करू लागले आणि त्याच्याशी सलोख्याचा एकही शब्द बोलू शकत नव्हते.
Nyochaa उत्पत्ती 37:4
4
उत्पत्ती 37:9
पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तो त्यांना म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले. सूर्य, चंद्र आणि अकरा तारे यांनी मला खाली लवून नमन केले.”
Nyochaa उत्पत्ती 37:9
5
उत्पत्ती 37:11
या कारणामुळे त्याच्या भावांचा द्वेष अधिक तीव्र झाला; परंतु त्याच्या वडिलांनी ही बाब आपल्या मनात ठेवली.
Nyochaa उत्पत्ती 37:11
6
उत्पत्ती 37:6-7
योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “माझे स्वप्न ऐका: आपण शेतात पेंढ्या बांधत होतो, तेवढ्यात माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुमच्या सर्वांच्या पेंढ्या माझ्या पेंढीभोवती गोळा होऊन उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला नमन केले.”
Nyochaa उत्पत्ती 37:6-7
7
उत्पत्ती 37:20
चला आपण याला ठार करू. त्याला एखाद्या विहिरीत फेकून देऊ आणि आपल्या वडिलांना सांगू की त्याला हिंस्र पशूने खाऊन टाकले आहे; मग त्याच्या स्वप्नांचे काय होते ते आपण पाहू.”
Nyochaa उत्पत्ती 37:20
8
उत्पत्ती 37:28
मिद्यानी व्यापार्यांचा काफिला म्हणजे इश्माएली लोक जवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफाला त्या विहिरीतून बाहेर काढले आणि वीस शेकेल चांदी घेऊन भावांनी योसेफाला विकून टाकले; आणि व्यापार्यांनी योसेफाला आपल्याबरोबर इजिप्त देशाला नेले.
Nyochaa उत्पत्ती 37:28
9
उत्पत्ती 37:19
ते एकमेकांना म्हणाले, “अरे हा स्वप्नदर्शी येत आहे.
Nyochaa उत्पत्ती 37:19
10
उत्पत्ती 37:18
त्याच्या भावांनी त्याला दुरून येताना पाहिले आणि तो पोहोचण्या आधी त्याला जिवे मारण्याचा कट रचला.
Nyochaa उत्पत्ती 37:18
11
उत्पत्ती 37:22
आपण रक्तपात करणार नाही; तर आपण त्याला या रानातल्या विहिरीत फेकून देऊ; परंतु त्याला हात लावू नका.” रऊबेनने असा बेत केला होता की नंतर योसेफाला विहिरीतून काढावे आणि आपल्या वडिलांकडे परत पाठवून द्यावे.
Nyochaa उत्पत्ती 37:22