1 करिंथकरांस 9:25-26
1 करिंथकरांस 9:25-26 MRCV
जो कोणी क्रीडास्पर्धेत भाग घेतो, त्या प्रत्येकाला कडक रीतीने प्रशिक्षण घ्यावे लागते. ते विनाशी मुकुट मिळविण्यासाठी करतात, परंतु आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी तसे करतो. म्हणून मी ध्येय नसलेल्या कोणा मनुष्यासारखा धावत नाही; मी केवळ मुष्टियुद्ध करीत नाही, म्हणजे हवेत मुष्टिप्रहार करत नाही.






