YouVersion Logo
Search Icon

फिलप्पै 1

1
1 # प्रेषित १६:१२ ख्रिस्त येशुना सेवक, मी पौल अनं तिमथ्य यासनाकडतीन;
फिलप्पै माधला ख्रिस्त येशुना सहवासमा राहनारा देवना सर्व लोकससंगे मंडळीना सर्व अध्यक्ष अनं सर्व सेवकसले;
2देव आपला पिता अनं प्रभु येशु ख्रिस्त यासना पाईन तुमले कृपा अनं शांती असो.
त्याना वाचणारासकरता पौलनी प्रार्थना
3माले तुमनी जी एकंदर आठवण शे तिनावरतीन मी आपला देवना आभार मानस. 4तुमना सर्वासकरता कायम प्रत्येक प्रार्थनाना येळले आनंदतीन ईनंती करस. 5पहिला दिनपाईन आजपावत सुवार्ताना प्रसारमा जी तुम्हीन मनी मदत करी तिनामुये मी तसं करस. 6ज्या देवनी तुमनामा चांगलं कामनी सुरवात करी तो, ते काम येशु ख्रिस्तना परत येवाना दिनपावत पुरा करी हाऊ माले ईश्वास शे. 7तुमना सर्वासबद्दल माले असं वाटानं योग्य शे, कारण मना बंधनमा अनी सुवार्तासंबधना प्रत्युत्तरमा अनं समर्थनमा तुम्हीन सर्व मनासंगे कृपाना भागीदार असामुये मी आपला अंतःकरणमा तुमले धरीसन शे. 8मनामा असणारा ख्रिस्त येशुना कळवळाघाई मी तुमना सर्वासकरता कितला उत्कंठीत शे यानाविषयी देव मना साक्षी शे. 9मनी हाई प्रार्थना शे की तुमनी प्रिती, सत्यना ज्ञानघाई अनं सर्व प्रकारना विवेकघाई अधिक अनं अधिक भलतीच वाढाले पाहिजे. 10अस की जे उत्तम ते तुम्हीन पसंत करानं अनी तुम्हीन ख्रिस्तना परत येवाना दिनकरता निर्मळ अनं निर्दोष ऱ्हावाले पाहिजे. 11अनी देवना गौरव अनं स्तुती व्हवाले पाहिजे म्हणीसन येशु ख्रिस्तनाद्वारा ज्या नितीमत्वाना फळ त्याघाई तुम्हीन भरी जावाले पाहिजे.
ख्रिस्त हाई जिवन शे
12भाऊसवन अनं बहिणीसवन माले ज्या गोष्टी घडण्यात त्यासनापाईन सुवार्ताले अडथळा नही व्हता त्या तीना वृध्दीले कारण व्हयन्यात हाई तुम्हीन समजी ल्या अशी मनी ईच्छा शे. 13#प्रेषित २८:३०म्हणीन राजभवनना सर्व सैनिकसमा अनं बाकीना सर्व जणसमा, मनी बंधनं ख्रिस्तना सेवक संबधना शेतस अशी त्यासनी प्रसिध्दी व्हयनी. 14अनी त्यासनी खात्री पटीन प्रभुमाधला बराचसा भाऊ, मना बंधननामुये उत्तेजीत व्हईन देवना वचन नही घाबरता सांगाकरता अधिक धीट व्हयेल शेतस. 15कितलातरी जन हेवातीन अनं वैरभावतीन ख्रिस्तनी घोषणा करतस, अनी कितलातरी जन खरापणतीन करतस. 16माले देवनी सुवार्तानासंबधमा प्रत्युत्तर देवाले निमेल शे हाई वळखीसन त्या घोषणा प्रितीतीन मुये असा करतस. 17पण दुसरा शेतस त्या मना बंधनं जास्त संकटना व्हवाले पाहिजे असा ईच्छातीन तड पाडाकरता दुजाभावतीन ख्रिस्तनी घोषणा करतस. 18ह्यापाईन माले काहीच फरक नही पडस? निमित्ततीन असो किंवा खरापणतीन असो, सर्व प्रकारमा ख्रिस्तनी घोषणा व्हस, अनी ह्यानामा मी आनंद करस अनं करसुच. 19कारण त्या तुमना प्रार्थनाघाई अनं येशु ख्रिस्तना आत्माना पुरवठाघाई मना उध्दारले कारण व्हई, हाई माले माहीत शे. 20जी मनी अपेक्षा अनी आशा तीनाप्रमानतीन, मी कसाघाई बी लाजावु नही, तर पुरा धैर्यतीन कायम प्रमानतीन आते बी, मना जिवन अनी मरणघाई, मना शरिरनाद्वारा ख्रिस्तना महिमा व्हई, 21कारण जिवन हाई काय शे? मनाकरता तर ख्रिस्त शे. अनी मरण हाऊ लाभ शे. 22पण जर शरिरमा जगणं हाई मना कामना फळ शे तर कोणतं निवडानं हाई माले सांगता येवाव नही. 23मी दोन्ही बाजु कडतीन खेचाई राहीनु शे. अनी आठेन सुटीसन ख्रिस्तना जोडे ऱ्हावानी माले आतुरता शे; कारण शरिरमा ऱ्हावापेक्षा हाई भलतच चांगलं शे. 24तरी तुमनाकरता माले शरिरमा ऱ्हावानं हाई अधिक गरजनं शे. 25माले अशी खात्री वाटामुये मी ऱ्हासु; अनी ईश्वासमा तुमले वृध्दी अनं आनंद व्हावा म्हणीन मी तुमना सर्वसजोडे ऱ्हासु हाई माले ठाऊक शे. 26हाई असाकरता की तुमनाकडे मनं परत येणं व्हवामुये, मनामुये ख्रिस्त येशुमा एक व्हवामुये अभिमान बाळगानं तुमले जास्त कारण व्हवाले पाहिजे. 27सांगानं ते इतलंच की ख्रिस्तना सुवार्ताले शोभी असं आचारण ठेवा, मी ईसन तुमले भेटनु किंवा तुमना जोडे वनू नही तरी तुमना संबधतीन मना ऐकामा अस येवाले पाहिजे की, तुम्हीन एकजिवतीन सुवार्ताना ईश्वासकरता एकत्र लढाई करत एकचित्ततीन स्थिर ऱ्हातस. 28अनी विरोध करनारा लोकसकडतीन कोणता बी विषयमा घाबरानं नही; हाई त्यासले त्यासना नाशना पण तुमना तारणना प्रमाण शे अनी ते देवकडतीन शे. 29कारण त्यावर ईश्वास ठेवाना इतलंच नही, तर ख्रिस्त कडतीन त्यानाकरता दुःख बी सोसानं अशी कृपा तुमनावर व्हयेल शे. 30#प्रेषित १६:१९-४०मी जे युध्द करेल शे तुम्हीन दखं अनं आत्ते मी जे करी ऱ्हायनु म्हणीसन तुम्हीन ऐकतस, तेच तुम्हीन बी करी राहिनात.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in