YouVersion Logo
Search Icon

निर्गम 24

24
परमेश्वर अनी इस्त्राएलसमा करार
1मंग त्यानी मोशेले सांग, तु, अहरोन, नादाब, अबीहू अनी इस्त्राएलसना वडीलसमाईन सत्तर जण मिळीसनी परमेश्वरकडं वर येईसनी त्याले दुरतीन दंडवत घाला. 2एकला मोशेनी परमेश्वरनीजोडे येवानं; बाकीना जोडे येवानं नही अनी इतर लोकेसनी ते त्यानासंगे वर चढीसनी येवानं नही. 3मंग मोशे लोकसनीजोडे जाईसनी परमेश्वरनं बठा वचन अनी बठा नियम त्यासले सांगं, तवय बठा लोके एक आवाजमा बोलनात की ज्या वचन परमेश्वरनी सांगेल शेतस त्याप्रमानं आम्ही वर्तन करसुत. 4#यहोशवा 4:3मोशेनी परमेश्वरना बठा वचन लिखी काढ अनी पहाटमास उठीसनी डोंगरनं पायथाले एक वेदी अनी इस्त्राएलनं बारा वंशपरमानं बारा खांब उभारं. 5त्यानी इस्त्राएल लोकेसमाईन काही तरुणसले धाडं, त्यासनी परमेश्वरले होमबली अनी बैलनं शांतीर्पण करं. 6मोशेनी अर्धा रंगत लयीसनी वाटकामा ठेवं अनी अर्धा वेदीवर शितडं.
7मंग त्यानी करार पुस्तक लयीसनी लोकेसले वाची दखाडं; ते आयकीसनी त्या बोलनात, जे काही परमेश्वरनी सांगेल शे ते बठं आम्ही करसुत अनी त्यानी आज्ञामा राहासुत. 8#मत्तय 26:28; १ करिंथ 11:25मोशेनी रंगत लयीसनी लोकेसवर शितडं अनी त्यासले सांगं की दखा, परमेश्वरनी हाई बठा आज्ञानी शर्तवर तुम्हनासंगे जे करार करेल शे त्यानं हाई रंगत शे. 9मंग मोशे, अहरोन, नादाब, अबीहू अनी इस्त्राएलमाईन सत्तर वडील वर चढीसनी गयात. 10त्यासनी इस्त्राएलनं देवनं दर्शन लिधं; त्याना चरनमा नीलमणीना चौरंगनागतक दखायनं जे आकाशनासारखा स्वच्छ व्हतं. 11इस्त्राएल लोकेसना सरदारसवर त्यानी हात उगारं नही; त्यानी परमेश्वरनं दर्शन लिधं अनी खावापेवानं कार्यक्रम करं.
सीनाय पर्वतर मोशे जास
12मंग परमेश्वरनी मोशेले सांगं; पर्वतवर चढीसनी मनाजोडे ये अनी तठे राहाय; मी तुले दगडन्या पाटया अनी लोकेसना शिक्षणकरता स्वतः लिखीसनी नियम अनी आज्ञा देस. 13मोशे अनी त्याना सेवक यहोशवा हया देवना पर्वतवर चढीसनी वर गयात. 14मोशे वडीलसले बोलना; आम्ही तुम्हनाकडे परत येतस तोपावत आठे तुम्ही वाट दखत राहावानं; दखा, अहरोन अनी हूर हया तुम्हनासंगे शेतस; कोण काही परकरन व्हयीते ते त्यानाकडे लयी जावानं.
15मोशे पर्वतवर चढी गया अनी ढगसघाई पर्वत झाकाई गया.
16परमेश्वरनं तेज सीनाय पर्वतवर राहीनं अनी ढगसनी सव रोज ते ढाकी टाकं अनी सातवा रोजले ढगमाईन परमेश्वरनी मोशेले हाक मारी. 17परमेश्वरनं तेज पर्वतना माथावर धगधगनारा आगप्रमाणं इस्त्राएल लोकेसले दखायनं.
18 # मत्तय 4:2; अनुवाद 9:9 हाई प्रकारं मोशे ढगमा जाईसनी पर्वतवर चढी गया; मंग तो पर्वतवर चाळीस दिवस अनी चाळीस रात व्हता.

Currently Selected:

निर्गम 24: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in