YouVersion Logo
Search Icon

निर्गम 23

23
न्याय अनी न्यायबुध्दी
1 # निर्गम 20:16; लेवीय 19:11-12 खोटी अफवा उडावानं नही; खोटा साक्षीदार व्हावाकरता ज्या वाईट शेतस त्यासले साथ देवानं नही. 2तु वाईट कराकरता गर्दिनीमांगे जावानं नही अनी गर्दीनी मांगे लागीसनी एकादा खटलामा चुकीनं न्याय व्हावाकरता साक्ष देवानं नही. 3#लेवीय 19:15गरीबसना खटला व्हयी तर भेदभाव करानं नही. 4आपला शत्रुना बैल नाहिते गधडा सुटा फिरतांना तु दख व्हयीते त्यासले फिराईसनी परत त्यानाकडे धाडी देवानं. 5#अनुवाद 22:1-4तु आपला शत्रुना गधडा भारखाल दाबायेल दखा व्हयीते त्याले तशेच सोडानं नही तर त्याले मदत करीन त्यामाईन सोडावानं. 6#अनुवाद 16:19तुना लोकासमाईन कोनी गरीब व्हयी त्याना खटलाना न्याय चुकीतीन करानं नही.
7खोटा खटलासपाईन दुर राहावानं; निर्दोष अनी न्यायी यासले मारानं नही, कारन दुष्टासले मी निर्दोष ठरावावु नही. 8लाच लेवानी नही; कारन लाच डोळासले आंधळी करस अनी न्यायीसनी शब्दले पलटाई देतस. 9#निर्गम 22:21; लेवीय 19:33-34 एकादा परकावर जुलुम करानं नही, कारण त्यासनं मन कशे राहास हाई तुम्हले माहिती शे; कारण तुम्हीबी मिसर देशमा पारका व्हतात.
सातवा वरीस अनी सातवा दिन
10 # लेवीय 25:3 सव वरीस आपला वावर पेरानं अनी तिना उत्पन्न साठाडानं; 11#लेवीय 25:1-7पण सातवा वरिशले तिले विसावा देईसनी तिले पडीत राहू देवानं, म्हणजे तुना लोकासमाईन कोणी गरीब व्हतीन ते तिमा उगाडेल खातीन अनी त्यासनी खायेल जे उरायेल व्हयी ते वनपशु खातीन. तुना द्राक्षमळा अनी जैतुन जंगल यानाबारामा तशेच करानं.
12 # लेवीय 23:3; अनुवाद 5:13-14 सहा रोज तु कामधंदा कर अनी सातवा रोजले आराम करानं, म्हणजे तुना बैल अनी गधडा यासले आराम भेटी अनी तुना दाससनी संतती अनी विदेशी यासना जीव तृप्त व्हयी. 13मी जे काही तुम्हले सांगेल शे त्या सर्वासनी बारामा सावध राहावानं, दुसरा देवसनं नावसुध्दा लेवानं नही, त्यासना नाम उच्चार तोंडमाईन आयकाले येवाले नही पाहिजे.
तीन वार्षीक सण
(निर्गम 34:18-26; अनुवाद 16:1-17)#निर्गम 34:18-26; अनुवाद 16:1-17
14वरिशमा तीनदाव तु मनाकरता मेळा भराईसनी सण करानं.
15 # लेवीय 23:6-8; गणना 28:17-25 बेखमीर भाकरीसनं सण पाळ; त्या सणासमा मना आज्ञापरमानं अबीब महिनामा नेमेल येळनं सात रोज तु बेखमीर भाकरी खा, कारण तोच महिनामा तुम्हीन मिसर देशमाईन बाहेर निघेल व्हता; कोनीच रिकामा हात लईसनी मनं दर्शनले येवानं नही.
16 # लेवीय 23:15-21 जवय वावरमा पैयरेल धान्यनं पहिलं पिक तयार व्हयी तवय तु कापणीनं सण पाळ अनी वरिशनं शेवटले तु आपला वावरमा कष्ट करेल फळनं साठा करशी तवय साठानं सण पाळ.
17वरशमा तीनदाव तुम्हना माधला बठा माणसानी परमेश्वर देवनं दर्शन लेवानं.
18मना यज्ञपशुसनं रंगत खमिरनं भाकरीसनीसंगे अर्पानं नही; अनी मनाकरता करेल सणसमासली वपा#23:18 मुळ शास्त्रात (चरबी) असं लिखेल शे सकाळपावोत राहु देवानं नही. 19#अनुवाद 26:2; 14:21; निर्गम 34:26आपला जमीननं पहिला उत्पन्नमाधला पहिला भाग आपला देव यहोवा याना मंदिरमा तु आणानं. कोकरू त्याना मायनं दुधमा शिजाडानं नही.
आज्ञा अनी समाचार
20दख, मी एक दूत तुन्हामोरे धाडी राहीनु, तो वाटमा तुनं रक्षन करी अनी जे ठिकान मी तयार करेल शे तठे तुले धाडसू. 21त्यानामोरे तुम्ही सावध राहीसनी त्याना म्हणनं मानानं; त्यानी आज्ञा मोडानी नही; कारण तो तुम्हना अपराधनं माफ कराऊ नही; त्यानामा मना नाव शे.
22जर तु खरच मनं म्हणनं ऐकशी अनी मी तुले सांगस ते बठ करशी तर मी तुना शत्रुना शत्रु, तुना विरोधीना विरोधी व्हसु. 23मना दूत तुनामोरे चालीसनी तुले अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी, अनी यबुसी लोकेसकडे लयी जासू अनी मी‍ त्यासना नाश करसू. 24त्यासना देवले तु नमन करानं नही, त्यानी पुजापाट करानी नही अनी त्यासनासारखा काम करानं नही, तर त्यासना नाश करानं अनी त्यासना खांबसनं तुकडा तुकडा करी टाकानं. 25तु आपला देव यहोवा यानी उपासना करानं म्हणजे तो तुम्हना अन्नपानीले बरकत देई अनी तुनामाधला रोगराई काढी टाकी.
26तुना देशमा कोनबी गर्भपात व्हावाले नही पाहिजे नाहिते कोनी वांझ राहावू नही अनी मी तुले बराच आयुष्य दिसुं 27ज्या ज्या लोकेसमा तु जाशी त्यासले मी आगोदरच मनी भिती घालीसनी त्यासले भिवाडसू अनी तुना शत्रु तुले पाठ दखाडतीन आशे करसू.
28मी तुनापहिले गांधीलमाशी धाडसू, त्या हिव्वी, कनानी, अनी हित्ती यासले तुनामोरेतीन पळाडसु. 29मी त्या बठासले एक वरिशमा हाकालावु नही; तशे करं ते देश उजाड व्हयी अनी वनपशु बराच व्हयीसनी तुले त्रास देतीन. 30तुनी संख्या व्हईसनी तु देशना ताबा लिसी तोपावत मी बागेबागे तुनामोरेतीन त्यासले काढसु 31तांबडा समुद्रपाईन ते पलिष्टीसना समुद्रपावोत अनी जंगलपाईन ते फरात नदिपावत तुना देशनी हद्द् करसू; त्या देशमाधला लोके तुना काबुमा आणसु अनी तु त्यासले तुनामोरेतीन हाकली दिशी. 32तु त्यासनासंगे किंवा त्यासना देवनीसंगे करार करानं नही. 33त्या तुना देशमा राहावाले नही पाहिजे; त्या राहीनात त्या मनाविरुध्दमा तुले पाप कराले लावतीन; कारन तु त्यासना देवनी पुजापाट करशी अनी त्या तुले पक्का फाशीवर आणतीन.

Currently Selected:

निर्गम 23: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in