YouVersion Logo
Search Icon

१ करिंथ 13

13
प्रेम हाई सर्वश्रेष्ठ दान शे
1जर मी मनुष्यना अनं देवदूतसना भाषा बोलनु, पण मना आंगी प्रेम नही राहीनं तर मी वाजणारी थाळी अनं झणझणारी झांज असा शे. 2#मत्तय १७:२०; २१:२१; मार्क ११:२३माले संदेश देवानं दान राहिनं अनी सर्व गुप्त गोष्टी अनं सर्व ज्ञान मनाकडे राहिनं अनी कदाचित मनाकडे डोंगर सरकावाना ईश्वास राहिना, पण मनामा प्रेम नही राहिनं तर मी काहीच नही शे. 3मी मनं सर्व संपत्ती गरीबसमा दान कराकरता दिधी, मनं शरीर जाळाकरता दिधं, अनी मना आंगे प्रेम नही राहीनं तर माले काहीच फायदा.
4प्रेम सहनशील शे, दयाळु शे; प्रेम हेवा करस नही; प्रेम फुशारकी मारस, फुगत नही. 5चुकीना व्यवहार करस नही, स्वार्थ दखस नही, चिडत नही, वाईट गोष्टीसना माहीती ठेवत नही.
6अनितीमा आनंद मानतस नही, तर सत्यमा आनंद मानतस, सर्व गोष्टीसमा धीर ठेवतस. 7सर्वकाही सहन करस, सर्व गोष्टीसवर ईश्वास ठेवस, सर्वासनी आशा करस.
8प्रेम कधीच संपस नही; संदेश राहतीन तर ते समाप्त व्हतीन, अनोळखी भाषा राहिन्यात तरी त्या समाप्त व्हतीन; अनी विद्या राहीनी तरी ती संपी. 9आपलाले थोडसच कळस, अनी देवकडतीन संदेश थोडासाच देता येस. 10पण पुर्णपणा ई तवय अपुर्णपणा नष्ट व्हई जाई.
11मी पोऱ्या व्हतु तवय पोऱ्यानामायक बोलु, पोऱ्यासारखी मनी बुध्दी व्हती, अनी पोऱ्यानामायक मना ईचार व्हतात; आते मोठं व्हवानंतर मी धाकलपणन्या गोष्टी सोडी देयल शेतस. 12आते आमले आरसामा अस्पष्ट दिसस; पण नंतर समोरा समोर दखुत; हाई येळले मनं ज्ञान अपुर्ण शे, पण नंतर पुर्णपणे मी वळखसु, जश देवकडतीन पुर्णपणे माले वळखमा येल शे.
13आपलाकडे ईश्वास, आशा, प्रेम ह्या तिन्ही शेतस; पण त्यामा प्रेम श्रेष्ठ शे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in