मार्क 9:30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50
मार्क 9:30 MARVBSI
नंतर ते तेथून निघून गालीलामधून चालले होते; आणि हे कोणास कळू नये, अशी त्याची इच्छा होती.
मार्क 9:31 MARVBSI
कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता; तो त्यांना असे सांगत होता की, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे; ते त्याला जिवे मारतील; आणि मारला गेल्यानंतर तिसर्या दिवशी तो पुन्हा उठेल.”
मार्क 9:32 MARVBSI
परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व त्याला विचारण्यास ते भ्याले.
मार्क 9:33 MARVBSI
पुढे ते कफर्णहूमात आले; आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, “तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता?”
मार्क 9:34 MARVBSI
ते गप्प राहिले, कारण सर्वांत मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती.
मार्क 9:35 MARVBSI
त्याने बसून त्या बारा जणांना बोलावून म्हटले, “जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वांत शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
मार्क 9:36 MARVBSI
मग त्याने एक बालक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले व त्याला कवटाळून त्यांना तो म्हणाला,
मार्क 9:37 MARVBSI
“जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, व जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.”
मार्क 9:38 MARVBSI
योहान त्याला म्हणाला, “गुरूजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणाएकाला आम्ही आपल्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता.”
मार्क 9:39 MARVBSI
येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्ये करून लगेचच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही.
मार्क 9:40 MARVBSI
कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे.
मार्क 9:41 MARVBSI
तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हांला पेलाभर पाणी पिण्यास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही, हे मी तुम्हांला खचीत सांगतो.
मार्क 9:42 MARVBSI
माझ्यावर विश्वास ठेवणार्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे.
मार्क 9:43 MARVBSI
तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक;
मार्क 9:44 MARVBSI
दोन हात असून नरकात म्हणजे न विझणार्या अग्नीत जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे.
मार्क 9:45 MARVBSI
तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक; दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे.
मार्क 9:46 MARVBSI
तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक; दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे.
मार्क 9:47 MARVBSI
तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथे ‘त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही’ अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे.
मार्क 9:48 MARVBSI
तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथे ‘त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही’ अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे.
मार्क 9:49 MARVBSI
कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल, [व प्रत्येक बलिदान मिठाने खारवतील].
मार्क 9:50 MARVBSI
मीठ चांगला पदार्थ आहे; परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणाल? तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा.”





