हाई समजी ले, शेवटला काळमा कठीण दिन येतीन, कारण माणुस स्वार्थी, पैसासना लोभ धरनारा, बडाईखोर, गर्विष्ट, निंदा करनारा, माय बापले नही माननारा, उपकारसले नही जाणनारा, अपवित्र, ममताहिन, क्षमा नही करनारा, चुगलखोर, असंयमी, क्रुर, चांगलास बद्दल प्रेम नही करनारा ईश्वासघात करनारा, गर्वतिन फुगेल, देववर प्रेम करापेक्षा सुखविलासनी आवड करनारा सुभक्तीनं बाहेरनं रूप दखाडीसन तिना स्वतःवर संस्कार नही असा लोकसपाईन बी दुर रहा.